सरकारद्वारे दिल्या जाणाऱ्या इतर कोणत्याही ओळखीपेक्षा आधार कसा वेगळा आहे?

आधार हा नागरिकाला आयुष्यभरासाठी दिला जाणारा विशेष 12 अंकी स्वैर क्रमांक आहे ज्याची आधार प्रमाणीकरण प्लॅटफॉर्मचा वापर करून कुठूनही ऑनलाईन पडताळणी करता येते. आधार प्रमाणीकरण केवळ “होय/नाही” अशाच स्वरुपात उत्तर देते. आधार योजनेचे मुख्य उद्दिष्ट सामाजिक सुरक्षा लाभ व अनुदान वितरण सुधारणे, त्यातील गळती व अपव्यय कमी करणे, नकली व खोटे लाभार्थी नष्ट करणे व पारदर्शकता व जबाबदारी वाढविणे हे आहे.