आधारची वैशिष्ट्ये

विशेषता

नक्कल नष्ट करण्याची प्रक्रिया नावनोंदणी प्रक्रियेदरम्यान संकलित केलेल्या रहिवाशाच्या जनसांख्यिक व जैवसांख्यिक माहितीची तुलनायुआयडीएआयच्या डेटाबेसशी करून रहिवासी आधीच डेटाबेसमध्ये आहे किंवा नाही हे पाहते.व्यक्तिला आधारासाठी केवळ एकदाच नावनोंदणी करावी लागते व नक्कल नष्ट करण्याच्या प्रक्रियेनंतर केवळ एकच आधार तयार केला जातो. जर, रहिवाशाने एकापेक्षा अधिकवेळा नावनोंदणी केली, तर नंतर केलेली नावनोंदणी फेटाळली जाईल.

सुवाह्यता

आधार राष्ट्रीय स्तरावर कोठेही घेऊन जाता येतो कारणत्याचे कुठेही ऑनलाईन प्रमाणीकरण करता येते. हे अत्यंत महत्वाचे आहे कारण लाखो भारतीय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा ग्रामीण भागातून शहरी केंद्रात स्थलांतरित होत असतात.

अनियत क्रमांक

आधार हा एक अनियत क्रमांक आहे व त्याच्याशी कोणतीही गोपनीय माहिती संबंधित नाही. नावनोंदणी करण्यासाठी इच्छुक व्यक्तिने नावनोंदणीच्या प्रक्रियेदरम्यान जैवसांख्यिक माहितीसह किमान जनसांख्यिकीय माहिती द्यावी लागते. आधार नावनोंदणी प्रक्रिया जात, धर्म, उत्पन्न, आरोग्य, भौगोलिक स्थिती इत्यादींसारखे तपशील घेत नाही.

वाढविण्यायोग्य तांत्रिक रचना

युआयडीची रचना मुक्त व वाढविण्यायोग्य अशी करण्यात आली आहे. रहिवाशाचा डेटा केंद्रीय पातळीवर संग्रहित केला जाईल व प्रमाणीकरण देशात कुठूनही करता येईल. आधार प्रमाणीकरण सेवेची बांधणी एका दिवसात १०० दशलक्ष प्रमाणीकरणे हातळण्याइतकी सशक्त करण्यात आली आहे.

मुक्त स्रोत तंत्रज्ञान

मुक्त स्रोत तंत्रज्ञानामुळे वाढविण्यासाठी विशिष्ट संगणक हार्डवेअर, विशिष्टसंग्रह क्षमता, विशिष्ट ओएस, विशिष्ट डेटाबेस विक्रेता, किंवा कोणत्याही विशिष्ट विक्रेता तंत्रज्ञानावर अवलंबून राहायची गरज नाही. अशी अॅप्लिकेशन मुक्त स्रोत व मुक्त तंत्रज्ञान वापरून तयार केली जातात व कोणताही विक्रेता असला तरी वाढवता येतील अशा पद्धतीने त्यांची रचना केलेली असते व यामुळे एकाच अॅप्लिकेशनमध्ये विविधप्रकारची हार्डवेअरही वापरता येतात.